Wednesday, May 16, 2007

खुळ्या कल्पना

फ़ुग्यातला फ़ुगा पाहीला आहे का कधी? गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत असतात नेहमी.मधे एक घेतला होता मी. सहजच,मजा म्हणून! रात्री खेळलोसुद्धा फ़ुग्याबरोबर. झोपताना समोरच होता फ़ुगा.

हज फ़ुग्याकडे लक्श गेलं.अचानक लक्शात आलं,बाहेरचा फ़ुगा फ़ुटल्याशिवाय आतला मिळणारच नाही.आणि आतल्या फ़ुग्याच्या जागी मला "तू" च दिसायला लागलास.पण काही केल्या कळेना की तुझ्या-माझ्या मधला हा मोठा फ़ुगा म्हणजे काय असावं? कदाचित हाच तो फ़रक ज्यामुळे तुझं-माझं क्षेेत्रं,जीवन सारं वेगळं केलं आहे. आपापल्या जगाला धक्का न लावता ,तू माझ्यापर्यंत आणि मी तुझ्यापर्यंत पोचायचे कसे?मोठाच प्रश्न पडला.हसूही आलं खुप!

आपण,आपलं जीवन,यांत आणि फ़ुग्यात नक्कीच फ़रक आहे,नाही का? तरिही, आपल्या दोघांमधला हा फ़ुगा कसा हटवावा या विचारातच झोप लागली.

सकाळी फ़ुग्याकडे लक्शच नव्हते. दुपारी जेव्हा फ़ुगा आठवला तेव्हा पाहीलं तर जमिनीवर बाहेरच्या फ़ुग्याचे,आपल्या दोघांतल्या त्या "फ़रकाचे" अवषेश पडले होते. आतला फ़ुगा, ज्यात मला तू दिसला होतास, वार्याबरोबर मुक्तपणे उडत होतास.

बाहेरचा फ़ुगा आपोआपच फ़ुटला होता! पण का? या सगळ्याचा अर्थ काय?

हा विचार अजुनही सुरू आहे!

-aditi

Saturday, May 12, 2007

पाऊलवाट

रानातल्या पाऊलवाटेशी
बोललाय का कधी?
कितीतरी वाटसरुंच्या
खुणा सांगते ती

भरभरुन बोलते ती
उत्तम वक्त्यासारखं
तुमचंही ऐकून घेते
जीवाभावाच्या सखीसारखं

आपल्या सौंदर्याचा
खुप अभिमान असतो तिलां
रेखीव वळणं,मातकट रंग
रानफ़ुले असतात जोडीला

सजते ती रोज
नवनवे रंग घेऊन
वाट पहाते तुमची

कधी जाता पाहुणे होऊन?

-aditi

तुझीच... मी.

सारं जुनं वि सरायचं
ठरवलं होतं मी.
माझंच मन दगा देईल
वाटलं नव्हतं कधी!

पुन्हा नाही ठेवायचं
त्या वाटेवर पाऊल,
जि थे आहे प्रत्येक पाऊलावर
फ़क्त तुझीच चाहुल

सदैव समोर तूच दि सतोस,
माझ्याशीच बोलत असतोस.
प्रत्यक्षात भेटत नाहीस कधीच
मग स्वप्नात तरी का येतोस?

यामध्ये दोष तुझा नाही
पुर्णपणे माझा आहे
हे पटवुन द्यायला तरी ये
मी.. मी वाट पहात आहे...

-aditi