Friday, November 30, 2007

जाणीव..

मायेच्या आपल्या माणसांमधे
जीवन किती सुरक्षित भासतं
आखलेली चॉकट,ठराविक माणसं
यांतच सारं आभाळ सामावलेलं असतं




एक नवं आभाळ बोलावतय
क्षितिजाच्या पार उडायला
वारयाचे दोर आहेत जिथे
हिंदोळ्यावर मुक्तपणे झुलायला

झोका देणारे हात असतिल
अन कदाचित तो थांबवणारेही
उडायची दिशा दाखवणारे असतील
तसेच, उडू न देणारेही...

तरिही तिथे जाऊन बघायचे आहे
नवनवीन अनुभव घेण्यासाठी
काहीही होवो तिथे, चांगले किंवा वाईट
माझं आभाळ नेहमीच असेल,परतण्यासाठी...!

aditi

Monday, November 26, 2007

माझ्यासाठी...

सोनेरी कवडश्यांमागे धावताना
चमचमत्या तार्याकडे तटस्थपणे पाहीलं
आज कळतय पण,
त्यानं आपलं अस्तित्व वाहीलं
माझ्या क्षुल्लक इचछेच्या पूर्तीसाठी...

मुसळधार कोसळणारा पाऊस
आडोशाखालून किती नकोसा वाटला
आता उमगतय,
सर्वस्व झोकून तो बरसत होता
क्षणात हर्षविणारं इंद्रधनु मला दाखवण्यासाठी...

प्रचंड गर्दी वाहणारा तो रस्ता
पार होण्यासाठी उगाचच वेळ घ्यायचा
आज समजतय,
तो अखंड अडथळे आणायचा
मला प्रयत्न करताना पाहण्यासाठी...

शब्द ऍकण्यासाठी कान आसुसलेले असताना
सभोवताली किलबिलाट नकोसाच वाटला
आज जाणवतय,
किलबिलाटाचं कारणच ते असेल
आपणच उडून जायला हवं होतं, त्यांच्या एकांतासाठी...

Friday, November 23, 2007

अनोळखी ओळख

विसरला असशील मला तू
आठवण येत नाही मलाही.
खोटे नाही रे बोलत मी,
विसरावं लागतं आठवण्यासाठी !

लक्षात राहण्यासारखं बोलणं
कधी आपलं झालंच नाही.
अगदी खरं सांगायचं तर
कधी बोलणंच झालेलं नाही

झालंच असेल काही तर
पाहणं आणि दुर्ल्क्ष्य करणं !
म्हणजे माझं तुझ्याकडे पाहणं
आणि तुझं कायम दुर्ल्क्ष्य करणं...

आता भेटल्यावर,
ओळखलं नाही म्हण खुशाल,
तेच उत्तर अपेक्षित आहे.
"वेगळं" असेल तर मात्र
धक्कादायक असणार आहे !

Thursday, September 13, 2007

कल्पनातीत..

कविता सहजच सुचतात मला,
कुण्या खासची गरज नाही
कल्पना आहेत फ़क्त माझ्या
कुणाला सांगुनही पटत नाही.

असायलाच हवं का कोणी ?
कल्पनेत नाही का असु शकत ?
असणार कसं कोणी, जर
शोधायचाच केला नाही प्रयत्न..

असेल नक्की, भेटेल भविष्यात
वाट पाहते मी प्रत्येक क्षणी
उत्तुंग अश्या त्या कल्पनेपुढे
लहानच भासते प्रत्येकवेळी

कधी वाटतं, फ़क्त एकदाच
भेटावं त्या कल्पनातीताला
जो न भेटताच कवितांच
वेड लावून गेला या मनाला !

-aditi

Saturday, September 8, 2007

स्वप्न

एक अनामिक हुरहुर असते मनात
कुणीतरी हळुच गुणगुणतं कानात
हवाहवासा वाटणारा आवाज असतो
कधी शब्दच येत नहीत ध्यानात

ओळखीच्या, आपल्यांच्या गर्दीमधे
त्या अनोळखीचीच आस असते,
काय झालय काहीच समजत नाही,
जागेपणीसुद्धा मी स्वप्नात असते.

वाट बघत असते नेहमी, पण
कुणाची?... कधीच सांगता येणार नाही.
येणार कुणीच नसतं, तरिही
मन मात्र मानायला तयार होत नाही.

पांढ्र्या घोड्यावरचा देखणा राजकुमार
असं सुंदर स्वप्न नव्हतं कधीच..
मन समजुन घ्यावं 'त्या'नं माझं,
अपेक्षा राहील फ़क्त एव्हढीच...

-aditi

Thursday, September 6, 2007

डोळे...

घारे, निळे, भुरक, काळे,
मनाचा ठाव घेणारे डोळे
दु:खात पाण्याचे लोट वाहणारे
आनंदाष्रुही हळूच टिपणारे,
एका कटाक्षाने घायाळ करणारे,
तर कधी नुसत्या नजरेची जरब बसवणारे,
मुक्यानेच लाखो प्रश्न करणारे,
कधी बोलताही सर्व बोलुन जाणारे,
कधी सदैव हसणारे अन हसायला भाग पाडणारे,
तर कधी कायम एक प्रकारचे आव्हान देणारे,
कितीतरी प्रकार, डोळ्यांचे, नजरांचे,
सगळे फ़क्त डोळसपणे अनुभवायचे...

-aditi

Friday, August 24, 2007

लपंडाव

वाटतं न सांगता कुठेतरी दूर जावं निघून,
मागं थकून जावं कुणीतरी मला शोधून शोधून

विचारावं सगळ्यांना कुठे दिसली का ती ?
दमलो आता,पण कुठे सापडलीच नाही ती..

आठवणींमधे माझ्या हरवुन जावं
मला पाहण्यासाठी व्याकूळ व्हावं..

मी आल्यावर हरखून जावं जणू स्वर्ग आला हाताशी
असेल का असं खरच कोणी? नाहीतर मजाच जायची लपण्यातली..

-aditi

Thursday, August 16, 2007

होरपळ

हक्क येतो तिथे संपतं म्हणे नातं
मग हक्काचं नातं असतं ते कोणतं?
विश्वासाला गेलेत संशयाचे तडे
का झुगारुन देउ नये असं हे नातं?

विचारलेल्या प्रश्नांचे हेतु वेगळेच असतात
दिलेल्या उत्तरांचे अर्थ मग वेगळेच निघणार
द्रुष्टी कळते तसे विचार नाही कळत
असंच चालू राहीलं तर हातात काय उरणार?

विशास म्हणजे दोन चाकांची गाडी
असं म्हणणं असतं बर्याच जणांच
प्रत्यक्शात ईथे एकाने वेगात पळताना
दुसर्याने केवळ फ़रपटत रहायचं...

-aditi

Wednesday, July 25, 2007

अनुभव

अचानक भरुन आलं
आभाळ काळ्या मेघांनी,
मनही भरुन आलं
का? न जाणे कोणी.
झोंबत होता सर्वांगाला
थंडगार वारा,
बहरुन गेला होता
आसमंत सारा...

त्रुप्त झाली अवनी
या टपोर्या थेंबांनी,
मळभ दुर झालं मनाचं
काय जादु झाली ?
स्वच्छ झालं सारंच
काही क्शणांच्या पावसानं,
अद्भुत असं काही
जाणलं या मनानं.

गुपीत आहे हे
फ़क्त आमच्या दोघांतलं
कुणालाच माहीत नसुनहीं
सर्वांनीच आहे जाणलेलं.
सांगायची गुपीतं नसतात ही
त्यांना फ़क्त अनुभवायच,ं
अनुभवल्याशिवाय जगणं इथ,ं
कुणालाच नाही जमायचं.

-aditi

Wednesday, July 18, 2007

प्रारंभ

तुझे विचार सुरु असताना
नजर वळते नकळत तुझ्याकडे
कावरं बावरं व्हायला होतं
कोणी बघत नव्हतं ना माझ्याकडे?

सगळे एकत्र असतो तेव्हा
काही बोलावंसं वाटत नाही
दोघेच असतो आपण तेव्हा
कसं बोलावं ते सुचत नाही

का घडतय आजकाल असं?
हे अजुन मला समजायचं आहे
माझ्या अबोध विचारांचा अर्थ
मला अजुन मगायचा आहे

तु पाहीलं आहेस का कुणाला
कधी असं चोरुन चोरुन?
राहुन आठवते ती चोरती नजरभेट
राहते मनाच्या हळुवार कप्यात दडुन

-aditi

Wednesday, May 16, 2007

खुळ्या कल्पना

फ़ुग्यातला फ़ुगा पाहीला आहे का कधी? गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत असतात नेहमी.मधे एक घेतला होता मी. सहजच,मजा म्हणून! रात्री खेळलोसुद्धा फ़ुग्याबरोबर. झोपताना समोरच होता फ़ुगा.

हज फ़ुग्याकडे लक्श गेलं.अचानक लक्शात आलं,बाहेरचा फ़ुगा फ़ुटल्याशिवाय आतला मिळणारच नाही.आणि आतल्या फ़ुग्याच्या जागी मला "तू" च दिसायला लागलास.पण काही केल्या कळेना की तुझ्या-माझ्या मधला हा मोठा फ़ुगा म्हणजे काय असावं? कदाचित हाच तो फ़रक ज्यामुळे तुझं-माझं क्षेेत्रं,जीवन सारं वेगळं केलं आहे. आपापल्या जगाला धक्का न लावता ,तू माझ्यापर्यंत आणि मी तुझ्यापर्यंत पोचायचे कसे?मोठाच प्रश्न पडला.हसूही आलं खुप!

आपण,आपलं जीवन,यांत आणि फ़ुग्यात नक्कीच फ़रक आहे,नाही का? तरिही, आपल्या दोघांमधला हा फ़ुगा कसा हटवावा या विचारातच झोप लागली.

सकाळी फ़ुग्याकडे लक्शच नव्हते. दुपारी जेव्हा फ़ुगा आठवला तेव्हा पाहीलं तर जमिनीवर बाहेरच्या फ़ुग्याचे,आपल्या दोघांतल्या त्या "फ़रकाचे" अवषेश पडले होते. आतला फ़ुगा, ज्यात मला तू दिसला होतास, वार्याबरोबर मुक्तपणे उडत होतास.

बाहेरचा फ़ुगा आपोआपच फ़ुटला होता! पण का? या सगळ्याचा अर्थ काय?

हा विचार अजुनही सुरू आहे!

-aditi

Saturday, May 12, 2007

पाऊलवाट

रानातल्या पाऊलवाटेशी
बोललाय का कधी?
कितीतरी वाटसरुंच्या
खुणा सांगते ती

भरभरुन बोलते ती
उत्तम वक्त्यासारखं
तुमचंही ऐकून घेते
जीवाभावाच्या सखीसारखं

आपल्या सौंदर्याचा
खुप अभिमान असतो तिलां
रेखीव वळणं,मातकट रंग
रानफ़ुले असतात जोडीला

सजते ती रोज
नवनवे रंग घेऊन
वाट पहाते तुमची

कधी जाता पाहुणे होऊन?

-aditi

तुझीच... मी.

सारं जुनं वि सरायचं
ठरवलं होतं मी.
माझंच मन दगा देईल
वाटलं नव्हतं कधी!

पुन्हा नाही ठेवायचं
त्या वाटेवर पाऊल,
जि थे आहे प्रत्येक पाऊलावर
फ़क्त तुझीच चाहुल

सदैव समोर तूच दि सतोस,
माझ्याशीच बोलत असतोस.
प्रत्यक्षात भेटत नाहीस कधीच
मग स्वप्नात तरी का येतोस?

यामध्ये दोष तुझा नाही
पुर्णपणे माझा आहे
हे पटवुन द्यायला तरी ये
मी.. मी वाट पहात आहे...

-aditi

Saturday, April 28, 2007

द्वंद्व

सारंखं वाटतं काहीतरी लि हावं
नवीन,वेगळं,सुंदर,छानसं
जे वाचल्यावर जाणवेल पुन्हा
मनातलं,खोलवर लपलेलं काहीसं

बरेच विचार येत असतात पण
लि हावेत असं वाटतच नाही
अनुभवलेलं असतं बरच पण
कागदावर ते पहावंच वाटत नाही

जुने दि वस जुने मैत्रच
अजुनही रुंजी घालतात मनात
फ़ार मागे राहीलय ते सारं
हे अजुनही येतअ नाही ध्यानात

स्पर्धेनं भारलेल्या या जगात
भावनेनं भारलेलं काही का नाही सुचत?
सग्ळ्या आपल्या माणसांमध्ये
कोणी "माझं" का नाही दि सत?

-aditi

Friday, April 13, 2007

यादें

यादें तो सारी हसाती है हमें
शरारतें आपकी गुदगुदाती है हमे
होंठ तो अब भी मुस्कुराते है हमारें
आखें है जो बेपर्दा करती है हमें..

धुंदला जाती है तस्वीर आपकी
कैसे समझाए हम इन आखोंको
आप खुद तो कभी आतें नही
क्यूं भेजते है फ़ि र इन यादोंको...?ं

-aditi

Friday, March 30, 2007

तरीही

व्यर्थ ढाळले अश्रु मी
ऊमजून आलय मला
प्रीतीची भाषा डोळ्यांची
कधी कळलीच नाही तुला!

काय चूक झाली,
काय घडला गुन्हा?
मागे वळलेली पावले
का थबकली पुन्हा?

उष:कालाच्या कल्पनेत
कि त्येक रात्री जागल्या
रडत नाही मी ,तरीही,
पापण्या माझ्या ओलावल्या

एकांतात आजसुद्धा
आवाज ऐकते तुझा
गर्दीमद्ध्ये आज्सुद्धा
डोळे शोधतात तुला...

-aditi

Saturday, March 17, 2007

सहवास सुखाचा

सुखाचे दि वस असतात
मि त्रपरीवाराच्या सहवासातले
फ़ुलपाखरासारखे राहतात
मनाच्या कोपर्यात सारे

मस्करी,चेष्टा चि डवणं त्यांचं
सारंच ऐकुन घ्यायचं असतं
लटकाच राग दाखवून पुन्हा
त्यांच्यातच सामी्ल व्ह्यायचं असतं

रुसवे फ़ुगवे तक्रारि सगळ्या
एकत्र येताच वि सराय्च्या असतात
उदास होत असाल कधी,तर
हेच सुखाचे शि डकावे असतात

सुवास धुंद नि शि गंधाचा
रंग असतो आगळा मनोहर
या आठवणींचा ठेवा असतो
जणू बहरलेला गुलमोहर

मैत्रीचं एकचं नातं,ज्यात
आवड असते ज्याची त्याची
सखे सवंगदी सरर्वा ं् साठी असतात
गरज असते फ़क्त शोधण्याची...!

-aditi

Wednesday, March 14, 2007

तु ...

मनकवडा कल्पव्रक्श तु
हवाहवासा पहि ला पाऊस तु
झोंंबणारा गार वारा तु
हि वाळ्यातली उबदार हवा तु
ओल्या मातीचा सुगंध तु
मनाला जडलेला छंद तु
वसंतातली पालवी तु
ग्रीष्मातली गार झुळुक तु
हिं दोळ्याचा उंच झोका तु
वाद्यांचे मधुर सूर तु
कर्णमधुर संगीत तु
उन्हातली शीतल सावली तु
आकाशीचा चंद्र तु
चकाकणारा प्रत्येक तारा त ु
सुखद सोनेरी दिवस तु
तेजस्वी इंद्रधनुष्य तु
जीवननौकेचा सूकाणू तु
आशेचा नवा किरण तु
नि रागस चेहय्राचं हास्य तु
उदास मनाचा आनंद तु
जि वापाड जपलेली आठवण तु
अंधारातला कवडसा तु
मनाला भावणारा नि सर्ग तु
या जीवनाचा मार्गदर्शक तु
जरी माझे सुखद स्वप्न तु
तरीही माझं सर्वस्व तु...

-अदि ती