Friday, August 24, 2007

लपंडाव

वाटतं न सांगता कुठेतरी दूर जावं निघून,
मागं थकून जावं कुणीतरी मला शोधून शोधून

विचारावं सगळ्यांना कुठे दिसली का ती ?
दमलो आता,पण कुठे सापडलीच नाही ती..

आठवणींमधे माझ्या हरवुन जावं
मला पाहण्यासाठी व्याकूळ व्हावं..

मी आल्यावर हरखून जावं जणू स्वर्ग आला हाताशी
असेल का असं खरच कोणी? नाहीतर मजाच जायची लपण्यातली..

-aditi

Thursday, August 16, 2007

होरपळ

हक्क येतो तिथे संपतं म्हणे नातं
मग हक्काचं नातं असतं ते कोणतं?
विश्वासाला गेलेत संशयाचे तडे
का झुगारुन देउ नये असं हे नातं?

विचारलेल्या प्रश्नांचे हेतु वेगळेच असतात
दिलेल्या उत्तरांचे अर्थ मग वेगळेच निघणार
द्रुष्टी कळते तसे विचार नाही कळत
असंच चालू राहीलं तर हातात काय उरणार?

विशास म्हणजे दोन चाकांची गाडी
असं म्हणणं असतं बर्याच जणांच
प्रत्यक्शात ईथे एकाने वेगात पळताना
दुसर्याने केवळ फ़रपटत रहायचं...

-aditi