कविता सहजच सुचतात मला,
कुण्या खासची गरज नाही
कल्पना आहेत फ़क्त माझ्या
कुणाला सांगुनही पटत नाही.
असायलाच हवं का कोणी ?
कल्पनेत नाही का असु शकत ?
असणार कसं कोणी, जर
शोधायचाच केला नाही प्रयत्न..
असेल नक्की, भेटेल भविष्यात
वाट पाहते मी प्रत्येक क्षणी
उत्तुंग अश्या त्या कल्पनेपुढे
लहानच भासते प्रत्येकवेळी
कधी वाटतं, फ़क्त एकदाच
भेटावं त्या कल्पनातीताला
जो न भेटताच कवितांच
वेड लावून गेला या मनाला !
-aditi
Thursday, September 13, 2007
Saturday, September 8, 2007
स्वप्न
एक अनामिक हुरहुर असते मनात
कुणीतरी हळुच गुणगुणतं कानात
हवाहवासा वाटणारा आवाज असतो
कधी शब्दच येत नाहीत ध्यानात
ओळखीच्या, आपल्यांच्या गर्दीमधे
त्या अनोळखीचीच आस असते,
काय झालय काहीच समजत नाही,
जागेपणीसुद्धा मी स्वप्नात असते.
वाट बघत असते नेहमी, पण
कुणाची?... कधीच सांगता येणार नाही.
येणार कुणीच नसतं, तरिही
मन मात्र मानायला तयार होत नाही.
पांढ्र्या घोड्यावरचा देखणा राजकुमार
असं सुंदर स्वप्न नव्हतं कधीच..
मन समजुन घ्यावं 'त्या'नं माझं,
अपेक्षा राहील फ़क्त एव्हढीच...
-aditi
कुणीतरी हळुच गुणगुणतं कानात
हवाहवासा वाटणारा आवाज असतो
कधी शब्दच येत नाहीत ध्यानात
ओळखीच्या, आपल्यांच्या गर्दीमधे
त्या अनोळखीचीच आस असते,
काय झालय काहीच समजत नाही,
जागेपणीसुद्धा मी स्वप्नात असते.
वाट बघत असते नेहमी, पण
कुणाची?... कधीच सांगता येणार नाही.
येणार कुणीच नसतं, तरिही
मन मात्र मानायला तयार होत नाही.
पांढ्र्या घोड्यावरचा देखणा राजकुमार
असं सुंदर स्वप्न नव्हतं कधीच..
मन समजुन घ्यावं 'त्या'नं माझं,
अपेक्षा राहील फ़क्त एव्हढीच...
-aditi
Thursday, September 6, 2007
डोळे...
घारे, निळे, भुरकट, काळे,
मनाचा ठाव घेणारे डोळे
दु:खात पाण्याचे लोट वाहणारे
आनंदाष्रुही हळूच टिपणारे,
एका कटाक्षाने घायाळ करणारे,
तर कधी नुसत्या नजरेची जरब बसवणारे,
मुक्यानेच लाखो प्रश्न करणारे,
कधी न बोलताही सर्व बोलुन जाणारे,
कधी सदैव हसणारे अन हसायला भाग पाडणारे,
तर कधी कायम एक प्रकारचे आव्हान देणारे,
कितीतरी प्रकार, डोळ्यांचे, नजरांचे,
सगळे फ़क्त डोळसपणे अनुभवायचे...
-aditi
मनाचा ठाव घेणारे डोळे
दु:खात पाण्याचे लोट वाहणारे
आनंदाष्रुही हळूच टिपणारे,
एका कटाक्षाने घायाळ करणारे,
तर कधी नुसत्या नजरेची जरब बसवणारे,
मुक्यानेच लाखो प्रश्न करणारे,
कधी न बोलताही सर्व बोलुन जाणारे,
कधी सदैव हसणारे अन हसायला भाग पाडणारे,
तर कधी कायम एक प्रकारचे आव्हान देणारे,
कितीतरी प्रकार, डोळ्यांचे, नजरांचे,
सगळे फ़क्त डोळसपणे अनुभवायचे...
-aditi
Subscribe to:
Posts (Atom)