
नव्या जगातले नवे रुतु,
किती पटकन रंग बदलतात,
आपण ग्रुहित धरतो खुपकाही,
पण सारे संदर्भच वेगळे असतात
पुढे जाता जाता मधुनच
एखादे खुसपट मागे ओढते
साधेसे शब्दही जिव्हारी लागतात
अन डोळ्यांमध्ये टचकन पाणी भरते
ओळखीची वाटणारी माणसे
मोक्याच्या क्षणी खुप विचित्र वागतात
आश्चर्याशिवाय काहीच उरत नाही
आठवणी मात्र मनात रुतुन राहतात
वेगळेच आहे बरेचकाही इथे
तरिही खुपकाही आपलेसे वाटते
अनोळखी चेहर्यावरचे साधेसे हास्यही
नकळतच विश्वास देउन जाते
-aditi
4 comments:
नव्या वर्षातला पहीला पोस्ट ...
आयुष्यातल्या नव्या टप्प्यातली पहीली कविता ...
पोस्टबरोबर ईमेज टाकण्याची नवी कल्पना ...
या नेवेपणाला सलाम मॅडम ...
आणि सांगायची गरज नाहीच ... सुरेख कविता!
hi mi aadhi vachali aahe Aditi... changli aahe mhanoon sangitle pan hote mi tula... vay hot chalale aahe ka tuze? :-P
Attention please!
->> Remove Viruses! <<-
kavitha vachun khup changale vatale= aditi go ahead
Post a Comment