Wednesday, July 25, 2007

अनुभव

अचानक भरुन आलं
आभाळ काळ्या मेघांनी,
मनही भरुन आलं
का? न जाणे कोणी.
झोंबत होता सर्वांगाला
थंडगार वारा,
बहरुन गेला होता
आसमंत सारा...

त्रुप्त झाली अवनी
या टपोर्या थेंबांनी,
मळभ दुर झालं मनाचं
काय जादु झाली ?
स्वच्छ झालं सारंच
काही क्शणांच्या पावसानं,
अद्भुत असं काही
जाणलं या मनानं.

गुपीत आहे हे
फ़क्त आमच्या दोघांतलं
कुणालाच माहीत नसुनहीं
सर्वांनीच आहे जाणलेलं.
सांगायची गुपीतं नसतात ही
त्यांना फ़क्त अनुभवायच,ं
अनुभवल्याशिवाय जगणं इथ,ं
कुणालाच नाही जमायचं.

-aditi

Wednesday, July 18, 2007

प्रारंभ

तुझे विचार सुरु असताना
नजर वळते नकळत तुझ्याकडे
कावरं बावरं व्हायला होतं
कोणी बघत नव्हतं ना माझ्याकडे?

सगळे एकत्र असतो तेव्हा
काही बोलावंसं वाटत नाही
दोघेच असतो आपण तेव्हा
कसं बोलावं ते सुचत नाही

का घडतय आजकाल असं?
हे अजुन मला समजायचं आहे
माझ्या अबोध विचारांचा अर्थ
मला अजुन मगायचा आहे

तु पाहीलं आहेस का कुणाला
कधी असं चोरुन चोरुन?
राहुन आठवते ती चोरती नजरभेट
राहते मनाच्या हळुवार कप्यात दडुन

-aditi