Saturday, May 12, 2007

पाऊलवाट

रानातल्या पाऊलवाटेशी
बोललाय का कधी?
कितीतरी वाटसरुंच्या
खुणा सांगते ती

भरभरुन बोलते ती
उत्तम वक्त्यासारखं
तुमचंही ऐकून घेते
जीवाभावाच्या सखीसारखं

आपल्या सौंदर्याचा
खुप अभिमान असतो तिलां
रेखीव वळणं,मातकट रंग
रानफ़ुले असतात जोडीला

सजते ती रोज
नवनवे रंग घेऊन
वाट पहाते तुमची

कधी जाता पाहुणे होऊन?

-aditi

4 comments:

@sh said...

now this is something happy.... that was too damn fast... keep the good work up...

ओहित म्हणे said...

lil off track though ... but i remembered the song from chameli - मशहूर है, फिरभी बदनाम वो ... जाने ... हुआ है आज क्या ... ... ...

Unknown said...

पाऊलवाटेची कल्पना आवडली...पण जरा छोटुसं वाटतय..I Think there is sufficient scope to enhance ur post. तरीही आवडलं हं..!

vikas said...

hay aadi realy I am shocked.I can't bealive on this all.
kashamadhe baghun lihalis hi kavita tevadhi haluch mala sang me kunala sangnar nahi