वाटतंंं न सांगता कुठेतरी दूर जावं निघून,
मागं थकून जावं कुणीतरी मला शोधून शोधून
विचारावं सगळ्यांना कुठे दिसली का ती ?
दमलो आता,पण कुठे सापडलीच नाही ती..
आठवणींमधे माझ्या हरवुन जावं
मला पाहण्यासाठी व्याकूळ व्हावं..
मी आल्यावर हरखून जावं जणू स्वर्ग आला हाताशी
असेल का असं खरच कोणी? नाहीतर मजाच जायची लपण्यातली..
-aditi
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
कुठे तरी पळून जावेसे वाटतय ... त्याने म्हणावे. तेही तिच्याच समोर. कदाचीत आपला विरह ती कसा झेलते बघण्यासाठी. मग तिने ऊलटा प्रतीसाद द्यावा ... मलाही घेऊन जा. मस्त ऑफिस चुकवून जावू! मग त्याने तिलाच फैलावर घ्यावे की असे कसे येड्यासारखे बोलते म्हणून. मग तिने म्हणावे की वा रे वा ... तुच तर पळणार होतास की. मी फक्त बरोबर येत होते.
...
... आणि मग कधीतरी खरोखर एकाने गायब व्हावे ... कदाचीत सांगून. कदाचीत ठरवून. आणि मग दुसऱ्याने स्वर्ग हाताशी येण्याची वाट बघत बसावे ...
:-)
Hey Lapandav khelayala malahi avadayache....Its great na if someone is looking for you?
Post a Comment