Wednesday, July 18, 2007

प्रारंभ

तुझे विचार सुरु असताना
नजर वळते नकळत तुझ्याकडे
कावरं बावरं व्हायला होतं
कोणी बघत नव्हतं ना माझ्याकडे?

सगळे एकत्र असतो तेव्हा
काही बोलावंसं वाटत नाही
दोघेच असतो आपण तेव्हा
कसं बोलावं ते सुचत नाही

का घडतय आजकाल असं?
हे अजुन मला समजायचं आहे
माझ्या अबोध विचारांचा अर्थ
मला अजुन मगायचा आहे

तु पाहीलं आहेस का कुणाला
कधी असं चोरुन चोरुन?
राहुन आठवते ती चोरती नजरभेट
राहते मनाच्या हळुवार कप्यात दडुन

-aditi

4 comments:

@sh said...

zakasssss kavita...
naav jara vegale vatale pan...

Aditya Shevade said...

I can swear now that you are in love with someone for sure.... Only one subject and so intense....

It's good...

hary said...

kavita tar chan aahe

kon aahe to samaju de ata

now it is an open secreat

U R IN LOVE

am i right?


ha pan kavita chan aahe

copy karayala

:)

Rohit said...

back again dude! लयी झकास ! एकदम मला गाणे आठवले ...

अताशा असे हे मला काय होते!
कोणा काळचे पाणी डोळ्य़ात येते!

का माहीत नाही ... पण आठवले!