Wednesday, July 25, 2007

अनुभव

अचानक भरुन आलं
आभाळ काळ्या मेघांनी,
मनही भरुन आलं
का? न जाणे कोणी.
झोंबत होता सर्वांगाला
थंडगार वारा,
बहरुन गेला होता
आसमंत सारा...

त्रुप्त झाली अवनी
या टपोर्या थेंबांनी,
मळभ दुर झालं मनाचं
काय जादु झाली ?
स्वच्छ झालं सारंच
काही क्शणांच्या पावसानं,
अद्भुत असं काही
जाणलं या मनानं.

गुपीत आहे हे
फ़क्त आमच्या दोघांतलं
कुणालाच माहीत नसुनहीं
सर्वांनीच आहे जाणलेलं.
सांगायची गुपीतं नसतात ही
त्यांना फ़क्त अनुभवायच,ं
अनुभवल्याशिवाय जगणं इथ,ं
कुणालाच नाही जमायचं.

-aditi

2 comments:

@sh said...

trupt zali avani hoy.. ;)
mala vatle jara kahani mein twist yeil.. pan traditional poem...

Rohit said...

पावसात काहीतरी जादू असते मात्र! एकदम पटलेले आहे! परत तेच गाणे आठवतयं ...


कधी दाटू येता घनांचा पसारा ...
कसा सावळा रंग होतो मनाचा ...
असे हालते आत हळूवार काही!
जसा स्पर्ष पाण्यावरी चांदण्यांचा!

खरच ऐक कधी तरी! तुझी कवीता एकदम live वाटतीये मला!! :-)