Sunday, March 30, 2008

प्रश्न

टपटपणारे थेंब अन कोसळणारा पाऊस
दोनही गोष्टी कशा होणार एकत्र ?
मग नव्याचं सुख अन जुन्याचं दु:ख
हे कसं एकाच वेळी जाणवतं ?

हळुवार झुळुक आणि सोसाट्याचा वारा
एकदम अनुभवता येईल का कधी ?
पण होऊन गेलेले आनंदी क्षण
कसे आणतात डोळ्यामध्ये पाणी ?

टिमटिमणारे तारे अन पॉर्णिमेचा चंद्र
दोन्हीसुद्धा तितकेच मोहवुन टाकणारे
आपल्यासाठी टिमटिमणारा ताराच बळी देतो
तरी चंद्रावर जीव ओवाळतात सारे

काहीच ताळमेळ नाही कशाचा
तरिही सारे जुळलेले दिसते
असेच असते का जीवनसुद्धा
धागे गुंतलेले तरी त्यातच जगावेसे वाटते..!

-aditi

11 comments:

@sh said...

wah wah... kya baat hain :)

नितीन बगाडे said...

खुपच मस्त

दोन विरुध्दाची सान्गड छान जुळवली आहे

keep it up !

मोरपीस said...

वा! अप्रतिम!

HAREKRISHNAJI said...

सुरेख

ओहित म्हणे said...

शेवटचं कडवं आवडलं पण खरं सांगू तर तुझ्या मागच्या कवितांसारखी मजा नाही आली!

पण तरीही... छान आहेच वादच नाही.

Quiz_Master said...

Nice..Although I dont understand marathi..But my dad translated it for me and I like it... Keep it up!

Anonymous said...

खूपच छान आहे.

Ruta said...

Prashna..kharach mast ahe!

Vish D. said...

Nice Aditi, I never knew about your poetic skills. Good job!!

Linking your blog address on my blog.

Unknown said...

TOO GOOD

Unknown said...

TOO GOOD