Saturday, December 19, 2009

Miss You..

Miss You..
किती भाव दाटलेले असतात
या दोन शब्दात..
अर्थ जेव्हा जाणवला
तेव्हा पाणी होतं डोळ्यांत

कोणाची कधी इतकी आठवण येईल
भेटण्यासाठी मन कासावीस होईल
बघण्यासाठी डोळे आतुर होतील
कान फ़क्त त्याच आवाजाचा वेध घेतील
खरंच कधी वाटलं नव्हतं

भविष्यात काय आहे..
नाही जाणून घ्यायचे आत्ताच
हा क्षण जगायचा आहे
फ़क्त तुझ्याच सहवासात..


-अदिती

3 comments:

Suhas Zele said...

अदिती, फार छान जमलीय पोस्ट...खूप छान एक्सप्लेन केलय "Miss You" ला

Sangram said...

झकास ! थोडेच दिवस आता ...! :)

Maithili said...

khoop chhan...!