कविता सहजच सुचतात मला,
कुण्या खासची गरज नाही
कल्पना आहेत फ़क्त माझ्या
कुणाला सांगुनही पटत नाही.
असायलाच हवं का कोणी ?
कल्पनेत नाही का असु शकत ?
असणार कसं कोणी, जर
शोधायचाच केला नाही प्रयत्न..
असेल नक्की, भेटेल भविष्यात
वाट पाहते मी प्रत्येक क्षणी
उत्तुंग अश्या त्या कल्पनेपुढे
लहानच भासते प्रत्येकवेळी
कधी वाटतं, फ़क्त एकदाच
भेटावं त्या कल्पनातीताला
जो न भेटताच कवितांच
वेड लावून गेला या मनाला !
-aditi
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
"KALPANATIT"
Pharach Sundar ...!!!!!!
Navach phar sudnar aahe aani
kavita tar....
tyahunahi sundar.....
keep it up ADITI
हा हा ... हे एकदम माझ्या तन्वी टाईप झाले :)
असो .. शेवटचे वाचून एकदम DDLJ आठवला ...
ऐसा पेहली बार हुवा है, सतरा अठरा सालो मे
अनदेखा, अंजाना ... आने लगा खयालोमे
reminded me of this excitement :-)
hehi adhi lihileles ... ki latest?
zakassss... u r getting better by the day.... :)
yeah very good, explains many other poems you wrote before too...
keep it coming and coming......
कविता सहज सुचतात तुला ...
ह ...
बंद का झालाय बाई? लिहा की आणखी!
Post a Comment