Friday, November 30, 2007

जाणीव..

मायेच्या आपल्या माणसांमधे
जीवन किती सुरक्षित भासतं
आखलेली चॉकट,ठराविक माणसं
यांतच सारं आभाळ सामावलेलं असतं




एक नवं आभाळ बोलावतय
क्षितिजाच्या पार उडायला
वारयाचे दोर आहेत जिथे
हिंदोळ्यावर मुक्तपणे झुलायला

झोका देणारे हात असतिल
अन कदाचित तो थांबवणारेही
उडायची दिशा दाखवणारे असतील
तसेच, उडू न देणारेही...

तरिही तिथे जाऊन बघायचे आहे
नवनवीन अनुभव घेण्यासाठी
काहीही होवो तिथे, चांगले किंवा वाईट
माझं आभाळ नेहमीच असेल,परतण्यासाठी...!

aditi

Monday, November 26, 2007

माझ्यासाठी...

सोनेरी कवडश्यांमागे धावताना
चमचमत्या तार्याकडे तटस्थपणे पाहीलं
आज कळतय पण,
त्यानं आपलं अस्तित्व वाहीलं
माझ्या क्षुल्लक इचछेच्या पूर्तीसाठी...

मुसळधार कोसळणारा पाऊस
आडोशाखालून किती नकोसा वाटला
आता उमगतय,
सर्वस्व झोकून तो बरसत होता
क्षणात हर्षविणारं इंद्रधनु मला दाखवण्यासाठी...

प्रचंड गर्दी वाहणारा तो रस्ता
पार होण्यासाठी उगाचच वेळ घ्यायचा
आज समजतय,
तो अखंड अडथळे आणायचा
मला प्रयत्न करताना पाहण्यासाठी...

शब्द ऍकण्यासाठी कान आसुसलेले असताना
सभोवताली किलबिलाट नकोसाच वाटला
आज जाणवतय,
किलबिलाटाचं कारणच ते असेल
आपणच उडून जायला हवं होतं, त्यांच्या एकांतासाठी...

Friday, November 23, 2007

अनोळखी ओळख

विसरला असशील मला तू
आठवण येत नाही मलाही.
खोटे नाही रे बोलत मी,
विसरावं लागतं आठवण्यासाठी !

लक्षात राहण्यासारखं बोलणं
कधी आपलं झालंच नाही.
अगदी खरं सांगायचं तर
कधी बोलणंच झालेलं नाही

झालंच असेल काही तर
पाहणं आणि दुर्ल्क्ष्य करणं !
म्हणजे माझं तुझ्याकडे पाहणं
आणि तुझं कायम दुर्ल्क्ष्य करणं...

आता भेटल्यावर,
ओळखलं नाही म्हण खुशाल,
तेच उत्तर अपेक्षित आहे.
"वेगळं" असेल तर मात्र
धक्कादायक असणार आहे !