Friday, November 30, 2007

जाणीव..

मायेच्या आपल्या माणसांमधे
जीवन किती सुरक्षित भासतं
आखलेली चॉकट,ठराविक माणसं
यांतच सारं आभाळ सामावलेलं असतं




एक नवं आभाळ बोलावतय
क्षितिजाच्या पार उडायला
वारयाचे दोर आहेत जिथे
हिंदोळ्यावर मुक्तपणे झुलायला

झोका देणारे हात असतिल
अन कदाचित तो थांबवणारेही
उडायची दिशा दाखवणारे असतील
तसेच, उडू न देणारेही...

तरिही तिथे जाऊन बघायचे आहे
नवनवीन अनुभव घेण्यासाठी
काहीही होवो तिथे, चांगले किंवा वाईट
माझं आभाळ नेहमीच असेल,परतण्यासाठी...!

aditi

4 comments:

ओहित म्हणे said...

All The Best dude ... for the new venture ...! जितम जितम जितम ...

बाकी highly tempted to write this about the last stanza ...

पैलतीर गाठताना ... आले ध्यानी गेला धीर,
पार पोचताना झाला ... पैलतीर, ऐलतीर!

@sh said...

fultu fresh kavita haan.. nice nice

all the very best. kon udu det nahi baghuch... fskahoiehajlahs saglya tya lokanna :)

HAREKRISHNAJI said...

कोण म्हणेल का आपण शायर नाहीत ? पण शायरी मधेच का थांबली ?

Anonymous said...

Nice