खुप गोंधळुन टाकतय नवं नातं
सवय नाही आहे या गोंधळाची,
म्हणुनच कदाचित नको वाटतय...
की भीती वाटते आहे काही गमवायची ?
किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये
ती मोकळीक नव्या नात्यात असेल ?
खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची
मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल ?
अशाच रंगत जातील का गप्पा
काहीही विषय बोलायला नसताना ?
की नुसतेच शांत रहावे लागेल
खुपसे विषय साचलेले असताना ?
निखळ मैत्रीच होती आजपर्यंत
कधी वेगळा विचारच केला नाही
जरुरीच नव्हती कधी पुढच्या पाऊलाची
आणि खरंच अजुनही वाटत नाही...!
सवय नाही आहे या गोंधळाची,
म्हणुनच कदाचित नको वाटतय...
की भीती वाटते आहे काही गमवायची ?
किती मोकळं होता येतं मैत्रीमध्ये
ती मोकळीक नव्या नात्यात असेल ?
खात्री नाही वाटत आहे या गोष्टीची
मनातलं बोलायचं स्वातंत्र्य नक्की असेल ?
अशाच रंगत जातील का गप्पा
काहीही विषय बोलायला नसताना ?
की नुसतेच शांत रहावे लागेल
खुपसे विषय साचलेले असताना ?
निखळ मैत्रीच होती आजपर्यंत
कधी वेगळा विचारच केला नाही
जरुरीच नव्हती कधी पुढच्या पाऊलाची
आणि खरंच अजुनही वाटत नाही...!
9 comments:
अभिनंदन [:)]
hmmm seriously, something fishy about the content :) Let me know before I find out from somewhere else :D
अभिनंदन!! छान आहे कविता.
गोव्यात राहून या ओळी नाही सुचल्या तर नवल. keep it up.
झक्कास
मजा आली कमेंट वाचून!! सही प्रश्नोत्तराचा तास झाला असेल! असो ... लगे रहो.
chhan.......best of luck....
hmm..something different this time...
[it smells something fishy..[:p]
WHOS THAT?? HMM?]
hmm....vayachach asa keva na keva tari...
Too good!!!
Post a Comment